जमीन एकाची, हक्क दुसऱयाचा, विकतोय तिसरा अन् चौथ्याची फसवणूक; ‘एसआरपीएफ’ अधिकाऱ्य़ांनी केला भंडाफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

शासनाच्या ‘सीलिंग ऍक्ट’नुसार संपादित झालेल्या जमिनीचा भूमिहीन शेतमजूर, स्वातंत्र्यसैनिकांना वाटप करण्यासाठी वापर करण्यात आला होता. त्यामुळे या जमिनिच्या सात-बारा उताऱयावर ‘भोगवटदार वर्ग-2’ असा शेरा आहे. याशिवाय ‘एसआरपीएफ कॅम्पसाठी भूसंपादन प्रस्तावित’ असा शेरा असलेली ही जमीन काही डेव्हलपर्सनी विक्रीला काढली. त्यांनी लाखो रुपयांचे टोकन घेऊन एसआरपीएफच्या जवानांसोबतच सौदा केला. मात्र, ‘एसआरपीएफ’च्या अधिकाऱ्य़ांच्या लक्षात ही बाब आल्याने या डेव्हलपर्सचा भंडाफोड झाला. त्यामुळे ‘जमीन एकाची, हक्क दुसऱयाचा, विकतोय तिसरा आणि फसवणूक चौथ्याची’ असा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील विजापूर रोडलगतच्या एसआरपीएफ कॅम्पशेजारच्या जमिनीवर घडल्याचे समोर आले आहे.

विजापूर रोडकर एसआरपीएफ कॅम्पशेजारी शासनाने सीलिंग ऍक्टनुसार संपादित केलेली जमीन आहे. पुढे ही जमीन भूमिहीन शेतमजूर-स्वातंत्र्यसैनिक यांना वाटप करण्याच्या हेतूने सोरेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील एका कुटुंबाला देण्यात आली. साहजिकच त्या जमिनीच्या सात-बारा उताऱयावर ‘भोगवटादार वर्ग-2’ असा जमिनीचा वर्ग नोंदविण्यात आला. त्यामुळे ‘सक्षम प्राधिकाऱयाच्या पूर्कपरवानगीशिकाय हस्तांतरणास बंदी’ असा दुसरा शेरा सात-बारा उताऱयावर आला. या जमिनीला लागूनच एसआरपीएफ कॅम्प असल्यामुळे ‘एसआरपीएफ कॅम्पसाठी भूसंपादन प्रस्ताकित’ अशी तिसरी नोंदही सात-बारा उताऱयावर झाली. म्हणजेच ही जमीन ज्याला शासनाने दिलेली आहे, त्याला ती विकता येत नाही किंवा त्या जमिनीच्या हक्कात बदली करता येत नाही. फक्त या जमिनीत पिके घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची उपजीविका करता येते.

कशी केली गडबड?

विजापूर रोडवरील ‘काकाश्री’ हॉटेलच्या पाठीमागे एसआरपी कॅम्पला लागून असलेल्या या जमिनीचे जमीनमालकासोबत डेव्हलपमेंट ऑग्रिमेंट करून शहरातील दोन डेव्हलपर्सनी जमिनीत बेकायदा प्रकेश केला. त्या जमिनीची साफसफाई व सपाटीकरण केले. पुढे स्वतःच लेआऊट करून त्या जमिनीवर प्लॉट पाडल्याचे दाखविले. त्याच प्लॉटचा इच्छुकांशी सौदा करून ‘टोकन अमाऊंट’ उचलण्यास सुरुवात केली.

घडला प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. ही जमीन ‘वर्ग-2’ची असून, त्या जमिनीवर एसआरपी कॅम्पसाठीचे भूसंपादन प्रस्तावित आहे. असे असतानाही संबंधित जमिनीवर  प्लॉट पाडून विकण्याचा प्रकार घडत आहे. या प्रकरणाची सध्या आमच्या स्तरावरून प्राथमिक चौकशीची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण संबंधित विभागाकडे सोपविले जाणार आहे. – विजय चव्हाण, समादेशक, एसआरपीएफ.

72 प्लॉटचा व्यवहार झाल्याची चर्चा

हायवे टच आणि शहरालगत कमी किमतीत प्लॉट मिळत असल्याने अनेक इच्छुक प्लॉट घेण्यास तयार झाले. प्लॉट विक्री सुरू असल्याची खबर कानोकानी पसरली. एसआरपी कॅम्पमधील अनेक जवान प्लॉट घेण्यास पुढे आले. गेल्या 15 दिवसांत तब्बल 72 प्लॉटचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. ‘टोकन अमाऊंट’ म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र, ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-2’ची असल्याचे कोणालाही कळू दिले नाही.

असा झाला भंडाफोड…

एसआरपी कॅम्पला लागूनच ही जमीन आहे. या जमिनीवर  दररोज वेगवेगळे लोक येताहेत. जमीन फिरून पाहिली जात आहे. अचानक या जमिनीवरच्या हालचाली वाढल्या. एके दिवशी जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे या जमिनीवर  खोदकामही सुरू झाले. त्याचदरम्यान एसआरपी कॅम्पच्या एका अधिकाऱयाला या हालचालींचा संशय आला. त्यांनी जेसीबीचालकाला हटकले. तेव्हा एक-एक करीत काही नावे आणि त्यांचे कारनामे पुढे आले व या प्रकरणाचा भंडाफोड झाला.