आबालवृद्धांनी घेतला खंडग्रास ग्रहण पाहण्याचा आनंद; मंदिरे, धार्मिक स्थळे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपोत्सवानिमित्त पृथ्वीवर दिव्यांचा झगमगाट असताना अवकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई  पाहायला मिळाली. राज्यभरातील विविध शहरांत आबालवृद्धांनी मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. सायंकाळी ग्रहण लागलेले असतानाच सूर्य अस्ताला गेला आणि ते अद्भुत दृश्य टिपण्यासाठी पॅमेरे सरसावले. तब्बल 27 वर्षांनंतर ऐन दिवाळीत आलेल्या सूर्यग्रहणाची पर्वणी खगोलप्रेमींना पाहायला मिळाली.

दिवाळी अमावस्येला म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहण सुरू झाले. सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण होते. हिंदुस्थानात ग्रहण दिसायला 4 वाजून 49 मिनिटांपासून सुरुवात झाली. त्याला ग्रहण स्पर्श असे म्हणतात. ते 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहिले. ग्रहण  बघण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहारांत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. अनेक इमारतींच्या गच्चीवर लोक जमा झाले. मरीन ड्राईव्ह येथे गर्दी झाली. दुर्बीण, सोलार गॉगलच्या सहाय्याने लहान- मोठय़ांनी ग्रहण पाहिले. नागपूरच्या रमण विज्ञान पेंद्रामध्ये नागरिकांसाठी ग्रहण बघण्याची विशेष सोय करण्यात आली.

मुंबईत 4 वाजून 49 मिनिटांनी ग्रहण दिसले. पुणे येथे 4 वाजून 51 मिनिटांनी, नाशिक येथे 4 वाजून 47 तर नागपूर येथे 4 वाजून 49 मिनिटांनी सूर्यग्रहण झाले. हिंदुस्थानसह आशिया खंडाचा पश्चिम- मध्य भाग संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागांतून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले.  ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6-08 वाजता सूर्यास्त झाला. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसला.

मंदिरे, धार्मिक स्थळे बंद

ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर सर्व मंदिरे बंद होती. शिर्डी येथील मुख्य दर्शनाची रांग बंद ठेवण्यात आली. मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार करण्यात आला. समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्र ठेवून मंत्रोच्चाराला प्रारंभ झाला. आरती झाल्यानंतर मुख्य दर्शन रांग सुरू झाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)