
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कॅन्सरवर उपचार घेऊन सोमवारी पहाटे हिंदुस्थानात पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती गोल्डी बेहल देखील होता. सोनालीने हिंदुस्थानात परताना डोक्यावर वीग न घालता तिचा ‘बाल्ड लूक’ तसाच ठेवला होता. सोनालीवर गेल्या पाच महिन्यांपासून न्यू यॉर्क येथे उपचार सुरू होते. सोनालीने दोन दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ती हिंदुस्थानात परतणार असल्याचे जाहीर केले होते.
सोनालीने जुलै महिन्यात इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कर्करोगावरील उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली. तेथे उपचारादरम्यान तिने तिच्या चाहत्यांसोबत तिच्यात घडणारे बदल, तिला होणारा त्रास व त्यातही त्याला ती कशाप्रकारे सकारत्मकतेने सामोरी जातेय हे सर्व शेअर केले.
























































