पुलांवर लागणार ध्वनिरोधक यंत्रणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील  पुलांवर वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे कर्णकर्कश आवाजाचे प्रदूषण टाळण्यासाठी पालिका आता रस्त्यांवरील ब्रीजवर ध्वनिरोधक बसवणार आहे. यासाठी विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. जे.जे. उड्डाणपुलासह इतर पुलांवरील वाहतूककोंडीमुळे मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीनंतर पुलांवर ध्वनिरोधक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत 34 उड्डाणपूल असून भविष्यात प्रत्येक उड्डाणपुलावर ध्वनिरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.