FIFA World Cup 2026 – मेस्सीचं स्वप्न भंगल, अर्जेंटिनावर मात करत स्पेन दुसऱ्यांदा ठरला जगज्जेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेन व अर्जेंटिनामध्ये थरारक लढत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत अटितटीच्या ठरलेल्या या सामन्यात स्पेनने मेस्सीच्या अर्जेंटीनाचा 1-0 ने पराभव करत विजय मिळवला. एक्स्ट्रा टाईममध्ये स्पेनचा स्टार विंगर फेरान टॉरेसने ऐतिहासिक गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तब्बल 16 वर्षानंतर स्पेनने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले आहे.

अतिरिक्त वेळेत फेरान टॉरेसचा निर्णायक गोल

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित 90 मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, ज्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत (Extra Time) गेला. सामन्याच्या 106 व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टॉरेसने (Ferran Torres) अप्रतिम गोल करत स्पेनला 1-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. हाच गोल अखेर विजयाचा मुख्य सूत्रधार ठरला.

स्पर्धेतील पुरस्कार

गोल्डन बूट (Golden Boot) – फ्रान्सचा कर्णधार किलीयन् एम्बाप्पे (Kylian Mbappé) – संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक १० गोल.

गोल्डन बॉल (Golden Ball – सर्वोत्कृष्ट खेळाडू) – स्पेनचा मिडफील्डर रॉड्री (Rodri).

गोल्डन ग्लव्ह (Golden Glove – सर्वोत्कृष्ट गोलकीपर) – स्पेनचा उनाई सायमन (Unai Simón).

सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू (Best Young Player) – स्पेनचा १९ वर्षीय बचावपटू पाऊ कुबार्सी (Pau Cubarsí).