
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया दहावी, बारावी परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शिक्षण मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान होणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 20 ते 23 मार्चदरम्यान होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च या काळात होणार आहे. परीक्षा काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हे समुपदेश मोबाईलद्वारे मार्गदर्शन करणार आहे.
समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, मात्र विद्यार्थी, पालकांनी परीक्षा पेंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न समुपदेशकांना विचारू नये, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.
समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक
7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902, 9011302997,
























































