अवघ्या चार रुपयांच्या तिकिटाचा वाहकाला बसला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोर्टाने निलंबन ठरवले योग्य

अवघ्या चार रुपयांचे तिकीट प्रवाशांना दोन दिवसांपूर्वीचे दिल्याने एसटी महामंडळाच्या वाहकाला नोकरी गमावावी लागली. या वाहकाला कामावरून काढून टाकण्याची शिक्षा योग्यच होती, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. याचा दंड म्हणून या वाहकाच्या सेवाकाळातील सात वर्षे ग्राह्य धरू नये, असे आदेश न्यायालयाने दिले.

24 जानेवारी 2002 रोजी प्रकाश हर्डीकर या वाहकाच्या एसटीतील प्रवाशांची तपासणी झाली. दोन प्रवाशांकडे दोन दिवसांपूर्वीचे चार रुपयांचे तिकीट सापडले. हर्डीकर यांच्याकडील कॅशमध्ये 53 रुपये अतिरिक्त आढळले. 4 फेब्रुवारी ते 23 मार्च 2002 या काळासाठी त्यांना निलंबित केले. 22 जून 2009मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. खातेनिहाय चौकशीअंती हर्डीकर यांना दोषी धरण्यात आले व कामावरून काढण्याचा निर्णय झाला. त्याविरोधात हर्डीकर यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने हर्डीकर यांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश रद्द केले. या आदेशाला महामंडळाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.