भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला. नवी नियुक्ती करताना भूषण गगराणी यांच्याकडील नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा विभाग या पदांचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपले अतिरिक्त सचिव म्हणून आशीषकुमार सिंह यांच्या जागी भूषण गगराणी यांची नेमणूक केली. दरम्यान, मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव दिलीप पांढरपट्टे यांची बदली अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार नंदकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.