
दोन आठवडय़ांपासून पडझड सुरू असलेल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये तब्बल 760 अंकांची वाढ होत 54 हजार 521 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 229 अंकांची वाढ होत 16 हजार 278 अंकांवर बंद झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक झळ सोसणाऱया गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कच्चा तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि जागतिक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढण्याबाबत घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. मात्र जागतिक मंदी आणि आयटी क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे बाजारावर अद्यापही दबाव असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.
























































