प्रभू श्रीरामाची प्राचीन मुर्ती सापडली, 42 वर्षांपूर्वी गेली होती चोरीला

686

विजयनगर साम्राज्य काळातील प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणाच्या अत्यंत सुंदर मुर्ती पुन्हा हिंदुस्थानच्या ताब्यात आल्या आहेत.मंगळवारी इंग्लंड सरकारने तमिळनाडू सरकारला या मुर्ती हस्तांतरीत केल्या. 1978 साली या मुर्ती चोरीला गेल्या होत्या.

stolen-idol-london-high-com

अत्यंत प्राचीन असल्याने काळ्या बाजारात त्या चढ्या दराने विकल्या गेल्या असाव्यात असा अंदाज आहे. प्राचीव वस्तूंचा संग्राहक असलेल्या एका अज्ञात व्यक्तीकडे या मुर्ती आल्या होत्या. त्याने त्यांचे मोल ओळखून पुन्हा हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला होता. या मुर्ती परत मिळवण्यासाठी तमिळनाडू पोलिसांनी लंडनच्या पोलिसांच्या सहकाऱ्याने या मुर्ती परत मिळवल्या आहेत.

या मुर्ती नागपट्टणम जिल्ह्यातील श्री राजगोपालस्वामी अनंतमंगलम मंदिरातून चोरीला गेल्या होत्या. या मुर्तींचा 1950 साली टीपलेला एक फोटो पुद्दुचेरीतील फ्रेंच शाळेत उपलब्ध होता. मुर्ती ज्या व्यक्तीच्या ताब्यात होत्या त्याने मुर्ती परत करण्याच्या उद्देशाने लंडन पोलिसांनी संपर्क साधला होता. पोलिसांनी तमिळनाडू पोलिसांशी याबाबत संपर्क साधला आणि तमिळनाडू पोलिसांनी 1950 सालचा या मुर्तींचा फोटो लंडन पोलिसांना पाठवला. या फोटोच्या आधारे लंडन पोलिसांनी या त्याच चोरीला गेलेल्या मुर्ती असल्याची ओळख पटवली होती. लंडनमधल्या उच्चायुक्त कार्यालयामध्ये या मुर्ती पुन्हा हिंदुस्थानच्या हवाली करण्यात आल्या. उच्चायुक्तालयाच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या