
महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले ट्विटर हँडल महिलांकडे सोपवणार आहेत. या महिलांनी कठीण परिस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवले आहे. यातील पहिली महिला आहे. मालविका अय्यर. मालविकाने लहानपणी एका स्फोटात आपले दोन्ही हात गमावले होते.
मालविका अय्यर ने वयाच्या 13 व्या वर्षी बिकानेरच्या एका स्फोटात दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर चेन्नईत मालविकावर उपचार करण्यात आले. या अपघातात मालविकाच्या पायांनाही गंभीर दुखापत झाली. तब्बल दोन वर्षे मालविका इस्पितळात होती.
Acceptance is the greatest reward we can give to ourselves. We can’t control our lives but we surely can control our attitude towards life. At the end of the day, it is how we survive our challenges that matters most.
Know more about me and my work- @MalvikaIyer #SheInspiresUs pic.twitter.com/T3RrBea7T9
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
या दुर्घटनेनंतर मालविकाने दिल्लीतून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. तसेच दिल्लीतूनच समाजसेवेचे धडेही गिरवले आणि मद्रास स्कूलमध्यी एम फिल पूर्ण केले. मालविकाचे धैर्य पाहून अनेक परदेशी संस्थांनी तिला मोटिवेशनल स्पीकर म्हणून आमंत्रित केले. आपल्या योगदानाबद्दल तिला अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यानंतर आहेत स्नेहा मोहनदास. ज्या पंतप्रधान मोदींचे ट्विटर हँडल करत आहेत. स्नेहा मोहनदास चेन्नईची रहिवासी आहे. तिने आपल्या फूड बँक बद्दल माहिती दिली आहे. आपल्या आईकडून प्रेरणा घेत तिने बेघर लोकांना जेवण देण्याची सुरूवात केली. या उपक्रमाला तिने फूड बँक इंडिया असे नाव दिले आहे.
You heard of food for thought. Now, it is time for action and a better future for our poor.
Hello, I am @snehamohandoss. Inspired by my mother, who instilled the habit of feeding the homeless, I started this initiative called Foodbank India. #SheInspiresUs pic.twitter.com/yHBb3ZaI8n
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवर तिने म्हटले आहे की, तुम्ही थॉट फॉर फूड बद्दल ऐकलेच असेल, आता त्यावर काम करणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे गरीबांचे भविष्य उज्ज्वल होईल.”
स्नेहाने भुकेल्यांना अन्न देण्यासाठी ज्या स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले त्यातील बहुतांशी लोक हे परदेशी होते. त्यांनी आतापर्यंत 20 सभा घेतल्या असून अनेक लोकांना या कामासाठी प्रेरित केले आहे.
त्यात एकत्र येऊन स्वयंपाक करणे, कुकुंग मॅरेथॉन, स्तनापान जागरुकता सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. ज्याची मला आवड आहे आणि मी तेच करते त्यामुळे मी सशक्त असल्याची जाणी होते असे स्नेहाने म्हटले आहे. लोकांनी किमान एका गरजवंताला अन्न द्यावे असे आवाहनही तिने यावेळी केले आहे.


























































