चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आज दिल्लीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱयांनी चर्चेतून तोडगा निघाला नाही तर उद्या दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यात पुन्हा चकमक उडण्याची शक्यता आहे. आज रविवारी हरयाणात 2 शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली. तर आंदोलना दरम्यान तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तीन पेंद्रीय मंत्र्यांची आज रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. दरम्यान, आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौथी बैठक आणि फक्त चर्चा
गेल्या तीन बैठकांमध्ये पेंद्र सरकार आणि शेतकऱयांमध्ये केवळ चर्चाच झाली. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. 8, 12 आणि 15 फेब्रुवारी अशा तीन बैठका झाल्या. आज रविवारी चौथी बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शंभू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी चौथी बैठक यशस्वी झाली नाही तर कुठल्याही परिस्थितीत दिल्लीत धडक देणार, अशी घोषणा केली.

– हरयाणाच्या सर्व जिह्यांमध्ये उद्या 19 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट बंद असणार आहे.