जालना जिल्ह्यात रेल्वेतून पडून बारावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील बारावीत शिकणाऱ्या यश नंदकिशोर हारकळ (17) या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी परतूर शहराच्या वखार महामंडळाच्या गोदाम जवळील रेल्वे रुळावर हा अपघात झाला. यश हारकळ हा विद्यार्थी शनिवारी पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथे जाण्यासाठी घराबाहेर पडला होता.

पहाटे निजमाबाद पुणे पॅसेंजर खाली रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला. शहराजवळच्या वखार महामंडळाच्या रेल्वे रुळावर ही घटना घडली. परतूर ग्रामीण रूगणालयात सकाळी 10 वाजता शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर गाव भागातील स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यशच्या अपघाती मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.