पैसा फंडच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्षांच्या हस्ते गौरव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर मधील दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते आज गौरवण्यात आले. ( छाया :- मिनार झगडे )

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाचा आणि दहावीचा निकाल यावर्षीही उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने निकालाची आपली उज्वल परंपरा यावर्षीही कायम राखल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. यावेळी सचिव धनंजय शेट्ये, सदस्य अनिल शेट्ये, अभय गद्रे, किशोर पाथरे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे, शिक्षक आणि वरिष्ठ लिपीक कुमार पाष्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९ : १५ टक्के, प्रथम क्रमांक घेवडे प्रतिक्षा प्रकाश ८१:३८, द्वितीय क्रमांक चव्हाण शेफाली अरविंद ७७:२३, तृतीय क्रमांक चव्हाण शृती शांताराम ७५:३८, वाणिज्य शाखेचा निकाल ९७:६० टक्के लागला असून प्रथम क्रमांक जुवळे प्रतिक्षा गंगाराम ८२:१५, द्वितीय क्रमांक गुरव दिव्या महेश ८०:६१, तृतीय क्रमांक सुवरे विद्या अनंत ७९:३८ कला शाखेचा एकूण निकाल ७६:१९ टक्के लागला असून प्रथम क्रमांक गुरव सारिका सुनिल ६२ :०० द्वितीय गुरव अश्विनी विश्वास ५५:०७, तृतीय गमरे आशिक जीवन ५२:७६ असे गुण मिळाले आहे. तीनही शाखा मिळून कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६:५९ टक्के लागला आहे. तर दहावीचा निकाल निकाल ९८ :१५ टक्के एवढा उल्लेखनीय लागला. विद्यालयातील शाल्वी रमेश घडशी हिने ९७ : ४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, मनाली सुहास सावंत हिने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सानिया यासीन मुजावर हिने ९३:४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शेट्ये यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.