मुरबाडच्या बांगरवाडीतील विद्यार्थ्यांची शाळा गाठण्यासाठी जिवाची बाजी

23


सामना प्रतिनिधी । मुरबाड

मुरबाड-कल्याण महामार्गावरील मामणोली गावापासून तीन कि.मी. अंतरावर 40 घरांची वस्ती असलेले बांगरवाडी गाव असून येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण पुढील शिक्षणासाठी कुंदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जावे लागते. परंतु या वाडीतील मुलांना पावसाळ्यातील तीन ते चार महिने चक्क कंबरेभर पाण्यातून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत.

नाल्यातून जाताना पुस्तके, वह्या भिजू नयेत म्हणून ही ‘रानपाखरं’ आपले दप्तर डोक्यावर घेतानाच एकमेकांचा हात धरत जीवमुठीत घेऊन शाळा गाठतात. त्यामुळे भिजलेल्या गणवेशात अख्खा दिवस त्यांना शाळेत बसावे लागत असल्याने ते आजारी पडतात. प्रशासनाने जागेचा वाद न सोडवल्यामुळे या नाल्यावरचे काम रखडले आहे. सरकारी बाबूंच्या बेफिकीर कारभारामुळे विद्यार्थ्यांना जिवाची बाजी लावून शिक्षण घ्यावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या