आता 10 वर्षांत पूर्ण करा एमबीबीएस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एमबीबीएस’ हा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना आणखी एका वर्षाची मुदत मिळणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) सध्याची 9 वर्षांची मुदत वाढवून 10 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे.

एनएमसीने ‘ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन (सुधारणा) नियमन, 2026’ या एमबीबीएस अभ्यासक्रमासंदर्भात मसुदा अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, 10 वर्षांमध्ये चक्राकार वैद्यकीय इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे.  एमबीबीएस प्रथम वर्षासाठी  4 प्रयत्नांपेक्षा जास्त संधी मिळणार नाही; मात्र संपूर्ण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 10 वर्षांचा कालावधी मिळणार आहे.