आजपासून सुधीर फडके जन्मशताब्दी महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेले विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या 25 ते 29 मार्च या कालावधीत ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी’ येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळय़ाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके व ज्येष्ठ गायक आणि लेखक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते 25 मार्च रोजी सायंकाळी 6.30. वाजता होईल. पहिल्या दिवशी ‘गीतरामायणा’चे सादरीकरण श्रीधर फडके करतील तर आनंद माडगूळकर निरूपण करतील.

चित्रपटाची पर्वणी

26 मार्च रोजी सुधीर फडके निर्मित व संगीतबद्ध केलेल्या ‘वीर सावरकर’, 27 मार्च रोजी ‘जगाच्या पाठीवर’ तसेच 28 मार्च रोजी ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटांचा महोत्सव मिनी थिएटर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अमादमी येथे दररोज दुपारी 3.30 वाजता होणार आहे.