पथराड येथील तरूणाचा जिल्हा परिषदेत आत्महदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

धरणगाव तालुक्यातील पथराड ग्रामपंचायतीसंदर्भातील विविध तक्रारींची तालुकास्तरावर दखल घेतली जात नाही. उलट आपल्यालाच ग्रामसेवकाकडून धमकावले जात असल्याचे सांगत पथराड येथील तरूणाने जिल्हा परिषदेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारी केला. यामुळे जिल्हा परिषदमध्ये एकच खळबळ उडाली.

पथराड येथील मिथून साळूंके याने मासिक सभेत बेकायदेशीर ठराव, एका महिला ग्रामपंचाय सदस्याने सरपंच असताना पदाचा राजीनामा न देता अंगणवाडी सेविकेचा पदभारही स्वीकारला आहे. तसेच विहीर न खोदता विहिरीचे अनुदान मंजुर करणे, पानपट्टी व घरपट्टी वसुल करून ती बँकेत न भरणे, दप्तर उपलब्ध करून न देणे, सावंतसर शिवार रस्त्यात जेसीबीने काम करून मजूरांच्या नावावर पैसे मंजूर करणे यासह विविध तक्रारी बीडिओ व ग्रामसेवकांकडे केल्या होत्या. मात्र ग्रामसेवक शरद सूर्यवंशी हे या तरूणालाच धमकावित असल्याने साळुंखे याने जळगाव येथील जिल्हा परिषदमध्ये येवून अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी म्हस्कर यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. साळुंखे यांच्या तक्रारी ऐकून घेत तात्काळ याप्रकरणी चौकशी समिती नेमण्या संदर्भातील आदेश तयार करण्याच्या सुचना दिल्या. चौकशी समितीत विस्तार अधिकारी यावल येथील अधिकारी तसेच एआरजीसचे अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांचा या चौकशी समितीत समावेश असेल. यासह बिडिओंनी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईले असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिथून साळूंके याने दि. १० डिसेंबरपर्यतचा अल्टिमेटम दिला आहे.