मुलांचे भावविश्व उलगडणारी कलाकृती, सुजय डहाकेचा नवा चित्रपट लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शाळा’, ‘फुंतरू’ असे नावीन्यपूर्ण प्रयोग करणारा दिग्दर्शक सुजय डहाके लवकरच नवा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित चित्रपटाचे नाव ‘तुझ्या आयला’ आहे. त्यासोबत ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ ही अनोखी टॅगलाइनही आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.

पुणे फिल्म पंपनीची प्रस्तुती असलेल्या ‘तुझ्या आयला’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच निर्मितीही सुजय डहाकेने केली आहे. उत्सुकता जागवणाऱया या पोस्टरवर नेटकरी भरभरून व्यक्त होत आहेत. टॅगलाइननुसार काहीतरी अनोख्या खेळाची माहिती देणारा हा चित्रपट असल्याचे समजते. चित्रपटाच्या पोस्टरवरील रेखाचित्रात एक झाड आणि त्याखाली दोन मुले दिसत आहेत. झाडावर शेळी, चाकू, डांबर, डॉक्टर, तोफ, चिवडा, गोटय़ा, लिंबू, नारळ, बैल, गाढव असे बरेच शब्दही रेखाटण्यात आले आहेत. 50 व्या इंडियन पॅनोरमामध्ये काwतुक झालेल्या या चित्रपटाने पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड, ऑडियन्स चॉइस अवॉर्ड आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी या तीन पुरस्कारांवर नाव कोरले आहे. हा प्रेक्षकांना एका अनोख्या विश्वाची सफर घडवणारा असून कधीही न पाहिलेले अफलातून चित्र दाखवणारा असल्याचे सुजयने सांगितले. राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजीत थिटे, सोहम बाबर, अभिषेक झेंडे आदींनी काम केले आहे.