माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर रविवारी जम्बो मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी कामकाजाकरिता माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी, 17 जुलै रोजी जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.55 वाजल्यापासून सायंकाळी 4.55 वाजेपर्यंत हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉक कालावधीत या स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर कोणतीही लोकल धावणार नाही.