सनी लिओनी विलगीकरणात, शेअर केले हॉट फोटो

13965

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याचा बॉलिवूडवर देखील परिणाम झाला असून चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणावर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी स्वत:ला त्यांच्याच घरात विलीगीकरणात ठेवले आहे. पॉर्नस्टार सनी लिओनी ही देखील खबरदारी म्हणून सध्या स्व विलगीकरणात आहे.

सनी लिओनीने तिच्या सोशल अकाऊंटवर काही हॉट फोटो शेअर केले असून त्यासोबत तिने मी यापेक्षा जास्त माझ्या चाहत्यांपासून लांब राहू शकत नाही अशी पोस्ट शेअर केली आहे. त्याआधी तिने काळ्या रंगाच्या एका हॉट ड्रेसमधील स्वत:चा फोटो शेअर करत ‘घरी बसून कंटाळला आहात, मग हा फोटो पाहत बसा’, अशी खोडसाळ कॅप्शन दिली आहे. सनीने तिच्या तिन्ही मुलांना मास्क घालून कोरोना पासून कसे वाचावे याचे प्रशिक्षण दिल्याची पोस्ट देखील शेअर केली आहे.

कॅलेंडरसाठी सनी लिओनी झाली होती न्यूड 

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडरसाठी पॉर्न स्टार सनी लिओनी न्यूड झाली होती. तिच्या त्या फोटोची जबरदस्त चर्चा झाली होती. त्या कॅलेंडर शूटमध्ये कियारा आडवाणी व भूमी पेडणेकरने टॉपलेस फोटो दिला आहे. या तिघींव्यतिरिक्त व्यतिरिक्त विद्या बालन, अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन यांचे देखील बोल्ड अंदाज पाहायला मिळाले.

कोरोनामुळे 13 दिवस शूटिंग ठप्प, बॉलिवूडला बसली कोट्यवधींची झळ

कोरोना व्हायरसचा परिणाम आरोग्य, अर्थव्यवस्था, पर्यटन अशा सर्वच घटकांना बसला आहे. यात आता चित्रपट आणि मालिका जगताचीही भर पडली आहे. कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद ठेवणं आवश्यक असल्याने अनेक चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहेत. आता प्रादुर्भाव टाळण्यासाठी चित्रीकरण रद्द करण्यात आलं असल्याने बॉलिवूड आणि मालिकांना कोट्यवधींचं नुकसान होणार आहे. 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत बॉलिवूड, ओटीटी आणि टीव्ही क्षेत्रातील चित्रीकरणं रद्द करण्यात आली आहेत. इम्पा, व्हिप्फासह अनेक चित्रपट आणि मालिका मंडळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, सलग 13 दिवस चित्रीकरण रद्द झाल्यामुळे बॉलिवूड आणि मालिका जगताचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे. हा आकडा मालिकांसाठी 100 कोटी तर चित्रपटांसाठी तब्बल 800 ते 1 हजार कोटी इतका असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या