‘नाराज’ धवन आता डेयरडेविल्सच्या संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shikhar-dhawan-hyderabad

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सनरायझर्स हैदराबादने तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्ली डेयरडेविल्स संघाला देऊन टाकले. त्यामुळे सलामीचा हा फलंदाज तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा डेयरडेविल्सच्या गोटात दाखल झाला आहे.

या वर्षी झालेल्या ‘आयपीएल’च्या लिलावात सनरायझर्सने शिखर धवनला ‘राइट टू मॅच’ (आरटीएम) कार्डद्वारे 5 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केले होते, मात्र मिळालेल्या रकमेवर धवन नाराज होता. त्यामुळे तो पुन्हा दिल्ली डेयरडेविल्स संघात दाखल झाला.