
अजित पवार यांच्यासह झालेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा दावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत टोला हाणला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या शरद पवारांचा सहारा घेत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बिचाऱया देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हालचाल करू देत नसतील. त्यामुळे ते पवारांचे नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावडय़ा उठवत आहेत. या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे, अशा व्यक्तीला अशा कंडय़ा पिकवायला वेळच कसा मिळतो? मला तर आपल्या राज्याची चिंता वाटायला लागलीय,’ असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला.
n शपथविधीचा मुद्दा हा काही सध्याचा देशातला चर्चेचा मुद्दा नाही. कदाचित फडणवीसांच्या राजकारणाचा तो भाग असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.




























































