
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा अँगल शोधणाऱया अंमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी पाच जणांना स्वतंत्र प्रकरणात अटक करून त्यांच्याकडून 1.4 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पश्चिम उपनगराच्या वर्सेवा येथील निवासस्थानातून राहिल विश्राम (42)याला ड्रग्ज केसच्या चौकशीनंतर अटक करण्यात आल्याचे एनसीबीने म्हटले आहे. अंकुश अर्नेजा (28)याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहिती आधारे एनसीबीच्या टीमने विश्रामच्या घरी छापा टाकला. विश्रामच्या घरातून 928 ग्रॅम चरस आणि 4 लाख 36 हजार रुपये एनसीबीच्या टीमने जप्त केले आहेत. अर्नेजाच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्याआधारे केलेल्या तपासात ड्रग्सच्या स्कतंत्र केसमध्ये पकडलेल्या चार जणांकडून 490 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
विशाल साळके (25)आणि जयचेतन रायचेरा (29) यांना बदलापूर येथून अटक करण्यात आली आहे. तर रोहन तलवार (29)आणि नॉगथंग लोटा (30)याला पवईतून अटक करण्यात आली आहे. एनसीबीने सुशांत प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौकिक यांच्यासह आतापर्यंत एक डझनाहून अधिक जणांना अटक केली आहे.
कोरोना साथीच्या काळात सध्या पोलीस कॉरिअरच्या भूमिकेत आहेत. जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते नागरिकांसाठी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसाठी कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात योगिक, एक्युथेरिपी शिबीर ठेवले होते. या शिबिरात कार्यकर्त्यांनी आणि थेरपिस्टनी पोलिसांना विविध प्रकारच्या आसन आणि मसाज करून त्यांना थोडे तणावमुक्त राहण्यासाठी धडे देत होते.


























































