खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडात संशयितांना अटक

Hardeep-Singh-Nijjar

गेल्या वर्षी ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित संशयीतांना कॅनडाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली, असं कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं शुक्रवारी सांगितलं. तपासात व्यग्र असलेल्या पथकानं काही महिन्यांपूर्वीच कॅनडामधील संशयितांची ओळख पटवली होती आणि त्यांच्यावर पाळत ठेवली होती, अशी माहिती सीबीसीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाही.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केलं होतं की कॅनडाचे अधिकारी निज्जर या कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमागे हिंदुस्थानी सरकारच्या एजंट्सचा हात असल्याचं सांगत आहेत. यानंतर हिंदुस्थानच्या सरकारनं ट्रुडोचा यांचा आरोप ‘बिनबुडाचा’ फेटाळून लावला होता.

तपासात सहकार्य करण्यासाठी कॅनडाने हिंदुस्थानवर दबाव आणला होता. अमेरिकेने नंतर उघड केलं की त्यांनी आपल्या भूमीवर शीख फुटीरतावाद्यांवर केलेला हत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता.

कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांच्या उपस्थितीने हिंदुस्थानी सरकार चिंतेत आहे. निज्जर याला हिंदुस्थाननं ‘दहशतवादी’ घोषित केलं होतं.