
ICC T20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मध्ये कोणते 12 संघ खेळणार हे आता निश्चित झाले आहे. झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव करत सुपर-12 मध्ये प्रवेश केला. सुपर-12 मधील आठ संघ आधीच निश्चित झाले होते. अ आणि ब गटातील सामने संपल्यानंतर श्रीलंका, नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि आयर्लंड उर्वरित चार स्थानांसाठी पात्र ठरले. गट अ मधील अव्वल संघ आणि गट ब मधील द्वितीय क्रमांकाचा संघ गट 1 मध्ये पोहोचला, तर गट अ मधील द्वितीय क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील अव्वल संघ गट 2 मध्ये पोहोचला. हिंदुस्थानसोबत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आधीच गट 2 मध्ये होते आणि आता नेदरलँड आणि झिम्बाब्वे त्यांच्या गटात पोहोचले आहेत.
सुपर-12 मध्ये हिंदुस्थानशी भिडणार हे संघ
23 ऑक्टोबर, हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता
27 ऑक्टोबर, हिंदुस्थान विरुद्ध नेदरलँड, सिडनी दुपारी 12:30 वाजता
30 ऑक्टोबर, हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4:30 वाजता
2 नोव्हेंबर, हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1:30 वाजता अॅडलेड
6 नोव्हेंबर, हिंदुस्थान विरुद्ध झिम्बाब्वे मेलबर्न, दुपारी 1:30 वाजता
दोन वेळा T20 विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यंदा सुपर-12 मध्येही पोहोचू शकला नाही. वेस्ट इंडिजचा संघ ब गटात शेवटच्या स्थानावर राहिला. ब गटातून झिम्बाब्वे आणि आयर्लंडचे संघ सुपर-12 मध्ये पोहोचले आहेत. त्याचवेळी अ गटातून श्रीलंका आणि नेदरलँड्सने सुपर-12 चे तिकीट कापले. श्रीलंका आणि आयर्लंडला गट १ मधील संघांशी मुकाबला करावा लागणार आहे.




























































