नेदरलँडचा सुपर-12 मध्ये प्रवेश; यूएई, नामिबिया T20 विश्वचषकातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईने गुरुवारी T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतील अ गटातील शेवटच्या सामन्यात नामिबियाचा 7 धावांनी पराभव केला. यामुळे श्रीलंका आणि नेदरलँड्स अ गटातून सुपर-12 साठी पात्र ठरले आहेत. यूएईने नामिबियावर सात धावांनी मात करत T20 विश्वचषकात पहिला विजय नोंदवला. परंतु आता युएई आणि नामिबियाचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे.

T20 विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये, श्रीलंकेचा संघ ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळेल, तर नेदरलँड्स गट 2 मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.

डेव्हिड व्हीजेच्या (55) अर्धशतकाच्या जोरावर यूएईने गुरुवारी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीच्या रोमांचक सामन्यात नामिबियाचा सात धावांनी पराभव केला. अ गटातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुहम्मद वसीमच्या (50) अर्धशतक आणि सीपी रिझवानच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर यूएईने 20 षटकांत तीन गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 141 धावा करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने 69 धावांत सात विकेट गमावल्या. यावेळी त्यांना सात षटकांत 80 धावांची गरज होती. व्हाईजने 36 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 55 धावा केल्या आणि रुबेन ट्रम्पलमन (25) सोबत आठव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली, परंतु त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. नामिबियाला शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेसे बाद झाला आणि त्यांचा सात धावांनी पराभव झाला.