Photo – जेठालालपेक्षा बापूजी वयाने लहान, ‘TMKOC’ बाबत अनोख्या गोष्टी जाणून घ्या

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या मालिकेबाबतच्या काही अनोख्या गोष्टी आपण जाणून घेऊया.

tarak-mehta-ka-ulta-chashma

या मालिकेत दिलीप जोशी जेठालाल तर अमित भट्ट हे जेठालाल गडाचे वडील बापूजी अर्थात चंपकलाल गडा यांची भूमिका करतात. मात्र या दोघांच्या वयामध्ये 6 वर्षांचे अंतर असून जेठालाल बापूजीपेक्षा वयाने मोठे आहेत.

tmkoc

मालिकेत पत्रकार पोपटलाल हा अविवाहित असल्याचे दाखवले आहे. रियल लाईफमध्ये पोपटलाल उर्फ श्याम पाठक यांचे लग्न झालेले असून त्यांना तीन आपत्य आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव रेश्मी आहे.

popatlal

दया जेठालाल गडा उर्फ दिशा वकानी आणि सुंदरलाल उर्फ मयूर वकानी हे पडद्यावरच नाही तर रियल लाईफमध्येही खरे भाऊ-बहीण आहेत. दिशा वकानी ही 2017 पासून या मालिकेत दिसलेली नाही. ती कधी पुनरागमन करणारा हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

dayaben-sundarlal

मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची भूमिका करणारे मंदार चंदवाडकर हे एक मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी दुबईमध्ये तीन वर्ष नोकरीही केली होती.

bhide

बबिताचा पती अर्थात कृष्णन सुब्रमण्यम अय्यरची भूमिका करणारे तनुज महाशब्दे हे सुरुवातीला मालिकेच्या लेखकांपैकी एक होते. मात्र दिलीप जोशी यांनी एक बंगाली-तमिळ कपलला शोमध्ये सहभागी करण्याची योजना आखली आणि तनूज यांनी मालिकेत एन्ट्री झाली.

iyer

2020 मध्ये या मालिकेने 3 हजार एपिसोड पूर्ण केले. टीव्हीवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकेने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

tmkoc-new