
हिंदुस्थानचा स्टार ऍथलीट तेजिंदरपाल सिंग तूरने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. त्याने गोळाफेकीत 20.64 गुण मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तेजिंदरपाल सिंग तूरचे हे सलग तिसरे पदक आहे. तेजिंदरपाल यावेळी सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. जर त्याने सुवर्णपदक जिंकले असते तर सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एकाच प्रकारात अव्वल स्थान पटकावणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला असता.























































