नदी-नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी ट्रॅश बुम टेक्नॉलॉजी; 3 महिन्यांत 10 हजार 500 क्युबिक मीटर कचरा काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील नदी-नाल्यांमध्ये वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रात जाऊ नये यासाठी पालिका तरंगता कचरा ‘ट्रॅश बुम’ या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने काढत आहे. सरकत्या पट्टय़ा आणि ट्रॅश बुमच्या सहाय्याने तरंगता कचरा जमा करण्यासाठी आठ ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यातून गेल्या तीन महिन्यांत तब्बल 10 हजार 500 क्युबिक मीटर तरंगता कचरा अडवून गोळा करण्यात आला आहे. डंपरच्या 750 फेऱयांनी हा कचरा वाहत नेऊन त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महानगरपालिका मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. यामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नद्या-नाल्यांच्या स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाय समुद्रकिनारा स्कच्छ राखणे, खारफुटीचे क्षेत्र प्लॅस्टिकमुक्त राखणे, प्लॅस्टिक आणि इतर कचरा समुद्रामध्ये थेट काहून जाण्याआधी अडवणे आणि त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या उपक्रमात केवळ विदेशात वापरल्या जाणाऱया ट्रश बुम किंवा ट्रशनेट तंत्राचा वापर केला जात आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली जलवाहिन्या विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या ठिकाणी बसवले ट्रॅश बुम
पश्चिम उपनगरातील जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अक्हेन्यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिकरा नदी, पोयसर नदी, दहिसर नदी, काकोला नदी तर पूर्क उपनगरातील मिठी नदी (कांद्रे-कुर्ला संकुल जोडपूल) अशा आठ ठिकाणी ही ट्रॅश बुम प्रणाली बसवण्यात आली आहे. तर नकक्या ठिकाणी म्हणजे मिठी नदीकर माहीम निसर्ग उद्यानाला लागून असलेल्या जागी येत्या आठकडाभरात ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण 45 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.