
टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंतचे सर्व सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. उद्या या मालिकेतील सर्वात तगडा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड विरोधात टीम इंडियाचा सामना होणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियाला एक जबरदस्त धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव जायबंदी झाला आहे.
हार्दिक पांड्या बांगलादेश विरोधातील सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना जखमी झाला. त्यामुळे न्यूझीलंडविरोधातील सामना तो खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाला धक्का मिळालेला असतानाच आता सूर्यकुमार देखील जखमी झाला आहे. सूर्यकुमार रघू सोबत नेट प्रॅक्टिस करत असताना त्याच्या मनगटाला दुखापत झाला. त्यानंतर त्याला नेटमधून बाहेर जावं लागलं. त्याचे न्यूझीलंड विरोधात खेळणे जर कठीण असल्याचे बोलले जात आहे.

























































