थकलेल्या मुख्यमंत्र्यांकडून काम करून घेतले, ‘जन विश्वास यात्रा’त तेजस्वी यादव यांची नितीशकुमारांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी उपमुख्यमंत्री असताना एका थकलेल्या मुख्यमंत्र्यांकडून काम करून घेतले, अशा शब्दांत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी तेजस्वी यादव यांची ‘जन विश्वास यात्रा’ हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगळवारपासून सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या यात्रेला निघण्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी मंदिरात पूजा-अर्चा केली. त्यानंतर आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. ही यात्रा बिहारमधील 38 जिह्यांत पोहोचणार आहे. 1 मार्च 2024ला या यात्रेचा समारोप होईल.

दरम्यान, कट-कारस्थान करून राष्ट्रीय जनता दलाच्या 10 ते 15 उमेदवारांचा पराभव करण्यात आला, असा गंभीर आरोप तेजस्वी यादव यांनी केला.