पोकळी काँक्रीटने भरण्यासाठी निविदा, अधीक्षकांविरोधात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडांच्या बुंध्याशी केलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यंदाच्या पावसात झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच झाडांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी उद्यान खात्याने चक्क काँक्रीट, युरेथेन व पॉलीयुरेथेन पह्मचा वापर करण्याबाबतची उपाययोजना सुचवलेली आहे. मुंबई महापालिकेने झाडांची देखभाल, संरक्षणासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. त्या कंत्राटात संबंधित उपाययोजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काँक्रीटमुळे शहरातील झाडांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाच झाडातील पोकळी भरण्यासाठी कंत्राटात काँक्रीटचा वापर करण्याबाबत पंत्राटात उल्लेख असल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आज उद्यान खात्यावर जोरदार टीका केली.