वाईन शॉप्स कलेक्शनची रोख रक्कम लुटणार्‍या दरोडेखोरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

वाईन्स एजन्सीचे कॅशीअर्स वाईन शॉप्स आणि वाईन बारकडून रकमेची वसूली करून त्यांच्या मुख्य कार्यालयात परतताना एक टोळी त्यांच्यावर पाळत ठेवत. आणि त्यांच्याकडील रोख रक्कम लूटून नेत. एजन्सीच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दरोडेखोरांना अटक केली.

उल्हासनगर कल्याण परिसरात वाईन्स शॉप्सकडून वाईन्स एजन्सीचे कर्मचारी रोख रक्कम गोळा करत. या कर्मचार्‍यांवर पाळ ठेवून काही दरोडेखोर त्यांना मारहाणकरून त्यांच्याकडील रोख रक्कम लूटत. यासंबंधी वाईन्स एजन्सीच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी या गुन्हेगारांच्या कार्यप्रणालीच बारकाईने अभ्यास करून सापळा रचला. व कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या आरोपींनी आतापर्यंत साडे सहा लाख रुपये चोरल्याचे समोर आले. सर्व आरोपींना शनिवारपर्यंत न्यायालय कोठडी सुनावण्यात आली आहे.