जाहिरातीचे शुल्क न भरता ठाणे पालिकेचा कर बुडवला

523

टीमटीच्या बसथांब्यांवर जाहिराती झळकवून ठेकेदाराने पालिकेचा कोटय़वधी रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने संबंधितांवर कारवाईबाबत चौकशी सुरू केली. या चौकशीसाठी एसीबीला सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने हायकोर्टाने एसीबीच्या या वेळकाढूपणाबाबत नाराजी व्यक्त करत चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा असे आदेश लाचलुचपत विभागाला दिले.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण 470 बस थांबे असून त्यापैकी 55 टक्के बसथांब्यांवर जाहिरातींचे फलक लावले आहेत, मात्र यापैकी केवळ अडीच टक्के बसथांब्यांचे शुल्क महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे असा दावा करत आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी महापालिकेने जाहिरात कंपनी ‘मे. सोल्युशन्स ऍडव्हर्टायझिंग’ला नोटीस बजावली, मात्र तरीही त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे लाचलुचपत विभागाने याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी याचिकेद्वारे केली.  सोमवारी या प्रकरणी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या