
समस्त अलिबागकरांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्लेखिंड येथील पात्रूदेवी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. चोरांनी पात्रूदेवीची मूर्ती आणि मंदिरातील इतर साहित्याची चोरी केली.
ही घटना बुधवार, 11 ते 12 जानेवारीदरम्यान घडली. चोरट्यांनी कार्लेखिंड येथील पात्रूदेवी मंदिराचे कुलूप तोडले. मंदिरातील पात्रूदेवीची मूर्ती आणि 7 हजार 800 रुपये किमतीच्या सामानाची चोरी केली. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मंदिरातील चोरीच्या या घटनेबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


























































