3 ते 5 जानेवारीदरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित स्वरांजली 2019 या तीनदिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. येत्या 3 ते 5 जानेवारीदरम्यान हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाची घोषणा करण्यासाठी शास्त्रीय संगीतातले ’दादा’ लोक वरळी येथे एकत्र आले होते.

महोत्सवात गायिका बेगम परवीन सुलताना, घटम विद्वान, टी.एच.विक्कू विनायक्रम, तालवादक व्ही सेल्वागमेश, गायक पंडित वेंकटेशकुमार आणि गायिका आरती अंकलीकर हे कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. स्वरप्रभाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची घोषणा करणाऱ्या ख्यातनाम संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, तालवादक तौफिक कुरेशी, तबलावादक आदित्य कल्याणपूरकर आणि स्वरप्रभा ट्रस्टचे अध्यक्ष पंडित प्रभाकर कारेकर यांनी वरळी सीफेस येथे अशी पोझ दिली.