विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

लांजा तालुक्यातील निवसर येथे विहिरीत काम करण्यासाठी उतरलेल्या तीन जणांचा गुदमरून मरण पावल्याची घटना घडली आहे. निवसर मळेवाडी येथील सगवेकर कुटूंबियांची विहीर साफ करण्यासाठी घरातीलच तीन जण विहिरीत उतरले होते. खोल विहीर असल्याने साफ करताना सुरुवातीला अंदाज आला नाही. काही वेळ काम केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले नेमके काय होत आहे याचा त्यांना अंदाज आला नाही. हळूहळू एक एक जण बेशुद्ध पडला. या बाबत विहिरीवर असल्याना याची काहीच चाहुल लागली नाही. काही वेळाने खालून आवाज येत नाही म्हणून वाकून पाहिले असता तिघेही बेशुद्ध पडल्याचे दिसून आले.

या बाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, निवसर वरचीवाडी येथे खोल विहिरीत असलेला गाळ व साफसफाई करण्यासाठी निवसर येथील विजय सागवेकर ( वय – 44 ) व नंदकुमार सागवेकर ( वय – 44 ) यांच्या समवेत बांबर येथील अनिल सागवेकर ( वय – 28 ) या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या बाबतची खबर निवसर पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांनी लांजा पोलीस यांनी फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, उपनिरीक्षक पी. व्ही. पाटील, चेतन उत्तेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.