
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दलाला तीन अतिरेकी मारण्यास यश आले आहे. गुरूवारी सकाळपासून अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. हे दहशतवादी जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे असल्याचे समोर आले आहे. सकाळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना मारले. त्याच भागात अजून अतिरेकी लपल्याचा संशय जवानांना होता. या चकमकीत चार जवान जखमी झाले.
#UPDATE Army: A cordon & search operation was launched today morning jointly by Police & security forces. Three terrorists were neutralized, arms & ammunition also recovered from the site of encounter. Terrorists were affiliated to Jaish-e-Mohammed & Hizbul Mujahideen. https://t.co/foCeguj3tB
— ANI (@ANI) January 3, 2019
अतिरेक्यांना वाचवण्यासाठी स्थानिक जनतेने जवानांवर दगडफेक केली. तरी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलीस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार गुलशन पोरा गाव अतिरेकी असल्याची खबर त्यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी शोधमोहीम हाती घेतली. लपलेल्या अतिरेक्यांना कळाले की सुरक्षा दलाने त्यांना चारी बाजूने घेरले आहे तेव्हा त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आणि त्यात तीन दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्द्दीनचे असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
























































