नगरच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणारे तिघे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नगर

नगरमधील एसीसीएस (आर्म्ड कॉप्स सेंटर ऍण्ड स्कूल) या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघे उत्तर प्रदेशचे तर एकजण पारनेर तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे लष्कराची बनावट ओळखपत्रे आढळली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

प्रदीप सीताराम शिंदे (रा. डिकसळ, पारनेर), रिझवान एजाज अली व सोनू नायजुद्दीन चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघे गुरुवारी दुपारी संशयितरीत्या नगरच्या एसीसीएस सेंटरच्या परिसरात फिरताना आढळले. लष्करी जवानांनी यांना लगेच पकडले. त्यातील शिंदे याच्या अंगावर लष्करी ड्रेस व बनावट कागदपत्रे होती. रिझवान व सोनू हे दोघे यूपीतील मुझफ्फरनगरचे आहेत.  तिघांनाही भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.