
व्याघ्र जीवनशैलीचे दर्शन घडविणारे हेमंत सावंत यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात 23 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत पाहता येईल. हेमंत सावंत यांनी कान्हा, बांधवगड, पन्हा, मेळघाट, ताडोबा, पेंच, रणथंबोर, जिम कॉर्बेट या जंगलात जाऊन व्याघ्र जीवनशैलीचा अभ्यास करताना त्यांच्या कॅमेऱ्यात ऐटबाज, आक्रमक, मित्रांसोबत रममाण होणारा, अशी व्याघ्र जीवनशैलीची दर्शन घडवणारी विविध छायाचित्रे टिपली आहेत. त्यातील सुमारे 50 छायाचित्रे मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांच्या हस्ते होणार आहे.


























































