टिपेश्वर अभयारण्यात वाघिणीचा मृत्यू, पुन्हा वाघिणीच्या मृत्यूने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tigress-new

सामना ऑनलाईन । यवतमाळ

टिपेश्वर अभयारण्यात वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गळ्यात तार अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. मात्र वनविभागाकडून वाघिणीच्या मृत्यू संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघिणीच्या गळ्यात कुंपणाची तार अडकल्याने ती जखमी झाली होती. यावेळी मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव झाल्याने या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अवनी म्हणजेत T-1 या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्यासह देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.