`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस

‘टाइम मॅगझिन’ने 2020च्या जगातील सर्वांत प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अभिनेता आयुष्यमान खुराणा, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर महत्त्वपूर्ण संशोधन करणारे रवींद्र गुप्ता आणि शाहीनबाग परिसरात ‘सीएए’विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या दादी म्हणजे बिल्किस यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींचा यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2014, 2015, 2017 आणि आता 2020 असे चौथ्यांदा या यादीत स्थान मिळाले आहे.

ह इतर नेत्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिनपिंग यांचा क्रमांक ट्रम्प यांच्यापेक्षा वरचा आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो. बिडेन, उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनाही स्थान आहे.

प्राध्यापक रवींद्र गुप्तांचीही दखल
एड्स, एचआयव्ही आजारावर उपचार पद्धती शोधण्यामध्ये बहुमोल कामगिरी बजावणारे संशोधक प्राध्यापक रवींद्र गुप्ता यांचा टाइम मॅगझिनच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गुप्ता यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीची दखल गेल्या वर्षी केंब्रिज विद्यापीठाने घेतली होती. लंडन येथील अॅडम्स या एचआयव्ही रुग्णावर गुप्ता यांच्या पद्धतीनुसार उपचार करण्यात आले व तो बरा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या