
सामना ऑनलाईन । मुंबई
दात किडणे … ही समस्या मोठय़ा प्रमाणेच लहान मुलांमध्येही असू शकते. यासाठी अतिशय वेदनादायी असलेल्या या दुखण्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.
- जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दात किडू शकतात. त्यामुळे कोणताही गोड पदार्थ खाल्ला की, चूळ भरा.
- जेवल्यानंतर दात स्वच्छ करा. जेवणानंतर दात साफ केले नाही तरीही दातांना कीड लागू शकते.
- चिकट वस्तू दातांच्या फटीत अडकून राहतात. त्यामुळे दातांना कीड लागते. म्हणून चिकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळजी घ्या.
- घरगुती उपाय करूनही दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करता येतात. एक चिमूट तुरटी पावडरमध्ये एक थेंब लवंग तेल मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने दातांना मसाज करा. असे दररोज केल्याने दातदुखी, दात पिवळे पडणे, दात किडणे इत्यादी समस्या दूर होतील.
- दात किडू लागल्याचे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.



























































