नेलपेंटचा असाही उपयोग

105

नेलपेंटचा असाही उपयोग

  • भाजी चिरताना किंवा एखादे काम करत असताना बोट कापले तर त्या जखमेवर नेलपेण्ट लावा. रक्त थांबण्यास मदत होते.
  • अनेकदा पॅकबंद डबे ओळखताना गोंधळ उडतो. अशावेळी त्या डब्यांवर नेलपेण्टच्या मदतीने खुणा केल्यास डबे पटकन ओळखण्यास मदत होते.
  • सुईमध्ये धागा टाकणे हे काम फार कठीण असते. पण सुईमध्ये धागा टाकून जात नसल्यास धाग्याच्या टोकाला थोडीशी नेलपेण्ट लावा. तो सुकेल तेव्हा सुईमध्ये धागा घाला. यामुळे सुईमध्ये धागा सहज जाईल.
  • अनेकांची त्वचा नाजूक असते. त्यांनी अंगावर काही खोटे दागिने घातले की त्यांना गळ्यावर खाज सुटणे किंवा तेथील त्वचा लाल होणे असे त्रास होतात. अशावेळी त्या ज्वेलरीच्या मागील बाजूस पारदर्शी नेलपेण्ट लावा. त्यामुळे ज्वेलरीचा संबंध थेट त्वचेशी येणार नाही आणि ऍलर्जीचा त्रास होणार नाही.
  • कपाटाच्या सर्व चाव्या एकसारख्या दिसतात. त्या वेगळ्या ओळखण्यासाठी त्यांनाही नेलपेण्ट लावून रंगवू शकता.
आपली प्रतिक्रिया द्या