गज वादळामुळे तमिळनाडूतील पोटनिवडणूक पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
printed-receipt-evm

सामना ऑनलाईन । चेन्नई

निवडणूक आयोगाने तमिळनाडूतील तिरुवर विधानसभा मतदरासंघाची पोट निवडणूकीची तीन जानेवारीची अधिसूचना रद्द केली आहे. तमिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी ही माहिती दिली असून आता ही निवडणूक २८ जानेवारी रोजी पार पडेल.

तत्कालीन द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम.करुणानिधी यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घोषित केली. परंतु इथे गज वादळाने थैमान घातल्याने सर्व राजकीय पक्षांनी ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.  या वादळामुळे विधानसभा क्षेत्रात निवडणूकीच्या कामकाजावा प्रभाव पडू शकतो अशी भीती राजकीय पक्षांनी व्यक्त केली.