
दाक्षिणात्य चित्रपटांसाठी 2022 हे वर्ष स्वप्नवत राहिले आहे. आरआरआर, केजीएफ-2 आणि कांतारा सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत विक्रम केले. दुसरीकडे ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ या बॉलिवूडपटांनीही प्रेक्षकांचे मन जिंकले. चला तर 2022मध्ये तिकीट खिडकीवर राडा घालणाऱ्या टॉप 10 चित्रपटांबाबत जाणून घेऊया.
केजीएफ चॅप्टर-2
केजीएफ चॅप्टर-1 चा सिक्वेल असणारा केजीएफ चॅप्टर-2 बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. 100 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने तब्बल 1200 कोटींचा गल्ला जमावला.
आरआरआर
एसएस राजमौली दिग्दर्शीत आणि ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट बनवण्यासाठी 500 कोटी लागले आणि या चित्रपटाने 1100 कोटींहून अधिक कमाई केली.
कांतारा
अभिनाता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचा कांतारा हा चित्रपट मजबूत चालला. 16 कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने तब्बल 400 कोटींची कमाई करत विक्रम रचला.
द कश्मीर फाइल्स
कश्मिरी पंडितांचे दु:ख दाखवणारा हा चित्रपट बनवण्यासाठी 25 कोटी खर्च आला. या चित्रपटाने जवळपास 252 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.
पोन्नियिन सेलवन 1
मणिरत्नम यांच्या अॅक्शन एपीक सीरिज न्नियिन सेलवनचा पहिला भाग प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या चित्रपटाने जगभरात 450 कोटींचा गल्ला जमवला.
विक्रम
कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने बजेटपेक्षा चारपट कमाई केली. 120 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिक गल्ला जमवला.
भूल भुलैया 2
कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा आडवाणी अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या भूल भुलैया 2 या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. 70 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने 185 कोटी कमावले.
दृश्यम 2
अजय देवगन याच्या बहुचर्चित दृश्यम 2 या चित्रपटानेही लोकांना भूरळ घातली. 70 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 175 कोटींची कमाई केली आहे.
बीस्ट
तमिळ चित्रपट बीस्टनेही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला. या चित्रपटानेही 240 कोटींहून अधिक कमाई केली.
गंगूबाई काठियावाडी
आलिया भट्टची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट मुंबईतील महिला माफिया क्विनवर आधारीत आहे. 125 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली.

























































