Video: सनीच्या ‘ब्लँक’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया, सनी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या ब्लँक या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या चित्रपटात सनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर करण सुसाईड बॉम्बरच्या भूमिकेत दिसत आहेत. हा ट्रेलर डिंपल कपाडियाचा जावई अक्षय कुमार व मुलगी ट्विंकल खन्ना यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.

‘टेररिझमचा कोणताही चेहरा नसतो. त्याचा धर्म फक्त पैस असतो आणि आपला धर्म फक्त ड्युटी’, सनी देओलच्या या जबरदस्त डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात सनी व करणसोबत इशिता दत्ता आणि करणवीर शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.