श्वानाच्या साथीनं सात वर्षे भटकंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील न्यूजर्सीचे रहिवासी टॉम टर्किच यांनी आपल्या लाडक्या श्वानासोबत 38 देशांची पायी भ्रमंती केली. सवाना असे त्यांच्या श्वानाचे नाव आहे. दोघांनी मिळून सात वर्षे ही भटकंती केली. सवानाच्या नावे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.

सुमारे 48 हजार किलोमीटरच्या या प्रवासात टॉमला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. टॉम यांच्या भ्रमंतीचे कारण काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. टॉम यांची मैत्रीण मेरी हिचा 2006 मध्ये एका दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे यांच्या आयुष्यात खूप नैराश्य आले. जीवन खूप लहान असल्याचे टॉम यांना वाटू लागले. म्हणूनच त्यांनी जगभ्रमंती करण्याचा संकल्प केला. टॉमने 2015 मध्ये आपल्या 26 व्या वाढदिवशी प्रवास सुरू केला. या प्रवासात अनेक चढउतार पाहिले.