पारोळा विटनेर फाट्याजवळ ट्रकची बसला धडक, ४० प्रवाशी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारोळा

पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील विटनेर फाट्याजवळ ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत ४० प्रवाशी जखमी झाले असून ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.

जळगाव-धुळे बस क्र. एम.एच २० १९५७ ही बस धुळ्याकडे जात असतांना येथुन जवळ असलेल्या विटनेर गावाजवळ ट्रक क्रमांक जी.जे. ०९१२ ने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील ४५ प्रवासी जखमी झालेत. तर ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. घटना घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

या अपघातात बस चालक फारूक शेख जब्बार यांच्यासह अशोक भावराव आडगाळे, केशव दिलीप लाठी, रामचंद्र दत्तात्रय एकलाडकर, चंद्रकांत रामदास सोनवणे, फरहीन निसार बागवान, फरजाना निसार बागवान, संजय सुभाष पाटील, मेघा शिवाजी चिकने, पूजा किशोर गलाडे, नीता किशोर गलाडे, ओम गलाडे, किशोर गलाडे, सुशीला भागवत पाटील, मयुरी प्रमोद पाटील, उत्कर्ष संतोष देसले, सुरेश रामदास खबाडे, जनाबाई भिकन मराठे, रेखा संदीप महाले, संदीप विठ्ठल महाले, रुपेश मिस्त्री, सुमित श्रीकांत शिनकर, रंजनी प्रल्हाद वडनरे, प्रल्हाद रामदास वडनरे, मनोज सुधाकर चौधरी, वर्षा मनोज चौधरी, विवेक छगन आहिरे, निलेश राजेंद्र पाटील, अक्षरा सुपडू सोनवणे, स्नेहल वारागणे, वैशाली अशोक साळी, शिवाजी बापू चिकने, सदा शिवाजी चिकने, उमेश शिवाजी चिकने, आशाबाई निंबा मोरे, भागवत बळीराम पाटील, उखा भिका राठोड, दिलीप लाठा यांच्यासह ८ ते १० जण जखमी झाले आहेत.

यातील गंभीर जखमी रामदास वडनरे, उखा राठोड, शेख फारुख अब्दुल, रजनी वडमनरे, आशाबाई मोरे, सुरेश गबायत, सुपडू सोनवणे व अक्षरा सोनवणे या ८ जणांना तातडीने धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींना पारोळा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी १६ प्रवाश्यांना बस परिवहन विभागाकडून प्रत्येकी ५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. जखमींवर डॉ. योगेश साळुंखे, डॉ.सुनील पारोचे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. राहुल जैन यांनी उपचार केले.